2 May 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मराठमोळ्या साईश्वरने जिंकली २१ किमी अंतराची चंदीगड नॅशनल हाफ मॅरेथॉन

चंडीगड : मूळचा सोलापूरचा असणारा आणि जुनियर मिल्खासिंग म्हणून ओळख असणाऱ्या साईश्वर गुंटूकने चण्डीगढ़ नॅशनल हाफ मॅरेथॉन ही तब्बल २१ किलोमीटरची स्पर्धा २ तास २१ मिनिटात पूर्ण करून १८ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दरम्यान साईश्वरला ट्राफी, मेडल सोबतच सर्वात लहान खेळाडू म्हणून ‘शेर-ए-पंजाब’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

साईश्वरच्या या यशाबद्दल अंध असलेले मॅरेथॉनपटू आणि ९३ वेळा हाफ मॅरेथॉन पूर्ण करुन गिनीज बुकमध्ये नाव नोंदवणारे अमरसिंह व थ्रिल झोन स्पोर्ट्सचे संस्थापक पी. सी. कुशवाह यांच्या हस्ते साईश्वरला ट्राफी, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वात लहान खेळाडू म्हणून साईश्वरचे ‘शेर-ए-पंजाब’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. ही स्पर्धा ड्रग्सविरोधी जनजागरण मॅरेथॉन म्हणून आयोजित करण्यात आले होते.

तसेच या स्पर्धेत बरेच अंध मॅरेथॉनरचाही समावेश होता. या स्पर्धेसाठी साईश्वरची निवड थ्रिल झोन स्पोर्टसचेे संस्थापक श्री. पी.सी. कुशवाह यांनी केले. या स्पर्धेत चंढीगडचे जिल्हा क्रीड़ाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. साईश्वरसोबत सेल्फ़ी घेऊन इतर अनेक स्पर्धकांनी आनंद व्यक्त केला. याआधी साईश्वरने पुण्यातील एच २० मॅरेथॉन ही १० किलोमीटरची स्पर्धा केवळ ५८.०६ मिनिटात पार केली आणि सर्व दिग्गज स्पर्धकांना विचार करायला भाग पाडलं. तसेच साईश्वरने हैद्राबाद मधील लव्ह स्पर्धेत अनेक दिग्गजांना धूळ चारली आणि मेडलवर स्वतःच नाव कोरल आहे. तर पंजाब मधील नॅशनल सोलन हाफ डोंगरी मॅरेथॉन ही ११ किलोमीटरची स्पर्धा त्याने अवघ्या २.०३ तासात जिंकून जागतिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना डोक्याला हात लावायची वेळ आणली. त्याचवेळी पंजाबच्या क्रीडामंत्र्यांच्या हस्ते साईश्वरला ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आलं.

चिमुकल्या साईश्वरची सातव्या वर्षातील कीर्ती अशी झाली की लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेत जिथे संपूर्ण देशातून म्हणजे तामिळनाडू, पंजाब, आसाम, हरियाणा, मुंबई, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातून खेळाडू भाग घेत असताना साईश्वरला त्या स्पर्धेचा ‘ब्रँड अम्बॅसिडर’ करण्यात आलं. तिथे छोट्या साईश्वरला मुख्य अतिथी हा मान मिळाला. आगामी मुंबई मान्सून आणि जम्मू मॅरेथॉन स्पर्धेत सुद्धा साईश्वर ‘ब्रँड अम्बॅसिडर’ असणार आहे. बर साईश्वर इथेच थांबला नाही कारण मुंबईमध्ये मे महिन्यात मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘रन फॉर ट्राय’ मध्ये भाग घेतला आणि त्याच्या धावण्याचा वेग पाहून ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया आणि आयर्लंड मधील स्पर्धक सुद्धा अवाक झाले. त्यामुळे हा छोटा जवान पुढे काय पराक्रम करू शकतो त्याचा अंदाज येऊ शकतो.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x