11 May 2025 9:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

काय शिकावं यातून? क्रुझच्या टोकावर सेल्फी-शो; मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर पोलीस हतबल

मुंबई : काल मुंबई-गोवा पहिली आंग्रीया ही अलिशान क्रूझ सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, या आलिशान क्रुझच्या शुभारंभाचा कार्यक्रम भाऊच्या धक्क्यावर मोठ्या दिमाखात काल पार पडला. या उदघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या टोकावर बसून सेल्फी काढला. परंतु त्यांच्या अशा वागण्याने त्या खूप चुकीचा संदेश देऊन गेल्या आहेत. आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत याचं साधं भान त्यांना नव्हतं असच म्हणावं लागेल.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या समोर उपस्थित सुरक्षा कर्मचारी सुद्धा हतबल होते आणि त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत ‘मी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे’ अशा अविर्भावात तो सेल्फी-शो करत होत्या. त्यामुळे या सेल्फिमुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि काही स्थानिक आमदार या कार्यक्रमावेळी उपस्थित राहिले. यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रूझवरील सर्वात वरच्या भागावर जाऊन टोकावर बसून सेल्फी काढला. त्यांच्या या सेल्फीमुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, त्यांनी केलेला तो सेल्फी-शो जाणून बुजून प्रसिद्धीसाठी तर नव्हता ना अशी शंका उपस्थितांमधील अनेकांनी उपस्थित केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या