मुंबई : अमृता फडणवीस यांची अखेर त्या सेल्फीशो बाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मी त्या ठिकाणी सेल्फीसाठी गेलेच नव्हते. तर शुद्ध हवा अनुभवण्यासाठी गेले होते. तसेच मी ज्या जागेवर बसले होते, ती जागा सुद्धा सुरक्षितच होती, असा अजून एक दावा दावादेखील त्यांनी केला. दरम्यान, माझ्यावर कारवाई केल्यानं एखाद्या माणसाचं जरी भलं होत असेल, तर कारवाई करण्यात यावी, असं अमृता फडणवीस स्पष्ट केलं आहे.
गेल्या आठवड्यात शनिवारी संपूर्ण भारतीय बनावटीची पहिला क्रूझ असलेल्या आंग्रियाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला होता. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढला. महत्वाची गोष्ट म्हणजे, पोलीस यंत्रणांसह इतरही अधिकारी सौ. फडणवीसांचा सेल्फी स्टंट पाहात असल्याचे व्हिडीओत दिसून आलं होत. त्यानंतर अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर ट्रोल झाल्या.
