13 May 2025 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून बाय रेटिंग, गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN Rattan Power Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉक खरेदी करा, मिळेल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: RTNPOWER Apollo Micro Systems Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा डिफेन्स कंपनी शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: APOLLO Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड कमाई होईल, शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

लायन एअरवेजचं विमान समुद्रात कोसळलं, विमानात १८८ प्रवासी होते

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली असून जकार्ताहून उड्डाण केलेले लायन एअरवेजचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या अपघातग्रस्त प्रवासी विमानात एकूण १८८ प्रवासी होते अशी माहिती पुढे येत आहे. लायन एअरवेजचं जेटी ६१० हे प्रवासी विमान समुद्रात कोसळले असून उड्डाणाच्या अवघ्या १३ मिनिटांनंतर ही दुर्घटना घडली आहे.

अपघातग्रस्त झालेले प्रवासी विमान जकार्ताहून पान्गकल पिनांगच्या दिशेने प्रवास करत होते. दार दरम्यान, विमानानं उड्डाण केल्यानंतर सकाळी ६.३३ वाजण्याच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर हे प्रवासी विमान कोसळल्याचीच माहिती समोर आली आहे. इंडोनेशियन प्रशासनाकडून जोरदार शोध मोहीम सुरू करण्यात आली. परंतु, १८८ प्रवासी असलेल्या कुटुंबीयांमध्ये अत्यंत तणावाचं वातावरण आहे असं स्थानिक वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या