8 May 2024 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

युवकांनो देश वाचवा!

मुंबई : दिल्ली मध्ये उत्तर प्रदेशातील एका माजी खासदाराचे पुत्र, विद्यमान आमदाराचे बंधू आणि कुख्यात बाहुबलीचे पुतने आशिष पांडे नावाच्या गुंडाने माजवला उन्माद. शहरातील एका पंचरांकित हॉटेल समोर शुल्लक कारणासाठी गर्दीच्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत, हातात जीवघेणी बंदूक, महागडी आलिशान गाडी, गाडीत हाय प्रोफाइल तीन मुली आणि त्यांच्या तोंडून सर्रास इंग्रजी शिव्या ऐकायला मिळाल्या आणि तो खासदार पुत्र एका इसमाला ठार मारण्याची चेतावणी वारंवार देत त्याच्या अंगावर बंदूक घेऊन जात होता, अतिशय वाईट शिव्या देत होता. वरून त्याच्या त्या मैत्रिणी त्याला प्रोत्साहन देत होत्या. सुदैवाने त्याच्या एक दोन मित्रांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला अन्यथा या नेत्याच्या माजलेल्या मुलाने बंदूक चालवून खुनच केला असता. आता इथून पुढे आगामी काळातही असेच होत जाणार, अवैध धंद्यातून, भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैस्यांच्या जोरावर भोगलेल्या किंवा भोगत असलेल्या सत्तेच्या हिम्मतीवर आणि राजकीय पक्षाच्या बळावर नेते आणि त्यांचे नातेवाईक सामान्यांचे जीवन उध्वस्त करायला माघे पुढे पाहणार नाहीत. आशिष पांडेने स्वतःही मागची विधासभा लढवली होती. रिअल इस्टेट आणि दारूचा त्यांचा धंदा, पैस्यांची काही कमी नाही, घरात श्रीमंतीचा पूर आहे. ना कायद्याचा धाक ना व्यवस्थेची भीती! सगळे खिशात!

आगामी काळात भारत देश हा जगातील सर्वात जास्त तरुण देश म्हणून ओळखला जाणार आहे. याची जाणीव ठेवून भारतातील सर्व तरुण तरुणींना देशाच्या आगामी जडणघडणीत मोलाचा वाटा उचलावा लागणार आहे. प्रशासन, उद्योग, वैदकीय क्षेत्र, विज्ञान, विधी, कला, संस्कृती, क्रीडा, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात आपापले अनमोल आणि सर्वोकृष्ट योगदान देऊन देशाला महासत्ता बनवण्यासाठी देशातील प्रत्येक तरुण बांधील आहेत. भारतीय युवक युवतींनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामं केली आहेत, करत आहेत आणि यापुढेही करतील पण भारतीय तरुण समाजकारण आणि राजकारणाकडे (लोकशाहीकडे) फारसे लक्ष देत नाहीत याचे दुष्परिम आपण मागच्या दीड-दोन दशकपासुन पाहत आलो आहोत आणि भविष्यात तर आपल्याला आशा मोठमोठ्या दुष्परिणाला सामोरे जावे लागणार आहे. म्हणून भारतीय तरुणाईने, लूळी-पांगळी होत चाललेल्या लोकशाही चे रक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समाजकरणासोबतच राजकारणात अर्थात लोकशाहीत प्रामाणिकपणे जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे.

राजकारणात सहभाग म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक लढवले पाहिजे असेही नाही केवळ लोकशाही मूल्यांची जोपासना आणि अधिकारांचा योग्य वापर केला तरी पुरेसे आहे. आज देशातील बरीच तरुण मंडळी राजकारणाकडे खूप वाईट नजरेने पाहतात आणि त्याचे जास्त गांभीर्य घेत नाहीत आणि जे मनावर घेतात ते खूपच कमी असतात. सर्वसाधारण युवक विचार करतात की जाऊद्या कशाला या सर्व ‘भानगडीत’ आपण लक्ष घालायचं आपल्याला स्वतःची कामं कमी आहेत काय? पण नेमके हेच चुकते सामान्य लोकांचं ते लोकशाही व राजकारणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, आपल्याला संविधानाने लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी दिलेल्या विशेष अधिकारांचा योग्य वापर करत नाहीत. म्हणून तर बापानंतर मुलगा, मुला नंतर नातू, मुलगी, पुतण्या, भाऊ, बहीण, दाजी, व्याही, जावई इत्यादी आहे नाहीत तेवढे नेत्यांची वंशावळे व नातेवाईक सत्तेत येतात, राजाश्रयाने, सत्ताकृपेने आणि राजकीय पक्षबाळाने अनेक, नैतिक-अनैतिक धंदे थाटतात आणि वैध अवैध लाखो करोडोंची संपत्ती (माया) गोळा करतात. आणि त्याच संपत्तीच्या जोरावर पुढील वाटचाली करतात म्हणजेच पुन्हा पुन्हा सत्तते येतात म्हणून तर आशिष पांडे सारखी राजकीय नेत्यांची लाखो मुजोर मुलं सामान्य लोकांवर पैस्यांच्या आणि सत्तेच्या जोरावर अधिराज्य गाजवायला घाबरत नाहीत. सर्व साधारण लोकांना जीवे मारण्याला सुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत कारण त्यांना सत्ता आणि पैस्यांपुढे कायदे व न्यायव्यवस्था कवडीमोलाची वाटते.

अशा सर्व मुजोर नेते आणि त्यांच्या पिल्लावळांना रोखण्याचे एकमेव सोपे मार्ग म्हणजे त्यांना त्यांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदानाची भीक न घालून त्यांची जागा दाखवणे आणि हे सर्व सामान्य लोकांनी जर ठरवलं की अमुक एका पैस्यांने आणि सत्तेने माजलेल्या नेत्याला किंवा त्यांच्या नातेवाईकांना हरवायचंच, तर हे अगदी शक्य आहे. जवळ जवळ सर्वांचीच अशी धारणा झाली आहे की, ‘राजकारण आणि निवडणूका या केवळ वारेमाप पैस्यांवर, राजकीय पक्षांच्या पाठबळींवर आणि राजकीय वारसांच्या आधारावरच जिंकता येतात, राजकारण हे आता श्रीमंतांच्याच घरची चूल झाले आहे. सामान्य, गरीब , प्रामाणिक, स्वच्छ, निर्मळ आणि निस्वार्थपणे सर्वसामान्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी सदैव सकारात्मक विचार ठेऊन लोकशाहीच्या तत्वाने कार्य करणाऱ्यांचे राहिले नाही’ आणि अगदी हेच तर या नेते मंडळींना हवे असते, जनतेच्या व युवकांच्या दुर्लक्षामुळेच तर राजकीय नेत्यांचे अनेक अपात्र, अयोग्य नातेवाईक निवडणुका लढवतात पैस्यांच्या जोरावर, कुटुंबियांच्या सत्तेच्या बळावर निवडूनही येतात आणि त्या आशिष पांडे सारखे कायद्याला न जुमानता सामन्यांचे जीवन उद्धवस्त करण्याच्या तयारीत सदैव राहतात आणि हे संपूर्ण देशाचे वास्तव आहे. आगामी काळात हे खूप फोफावत जाणार आहे. वेळीच या सर्वांवर अंकुश लागणे गरजेचे आहे.

काही अपवाद वगळता बऱ्याच राजकीय नेत्यांच्या नालायक, अयोग्य, अपात्र, अकार्यक्षम, अप्रामाणिक पिल्लावळांना किंवा नातेवाईकांना डोळे झाकून सहकार्य करून, समर्थन देऊन, मतदान करून आजचा तरुण वर्ग देशाला व देशातील प्रत्येक सामान्य जनतेला जीवघेण्या काळोखात नेतोय. यासाठी आगामी काळात सर्व तरुणांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा लागेल, कोणी निवडणूका लढवून तर कोणी योग्य उमेदवारांना समर्थन देऊन, त्यांना सहकार्य करून, त्यांना मतदान करून, योग्य उमेदवारांना निवडून देऊन लोकशाही रक्षणाचे मोलाचे आणि अत्यावश्यक कार्य करून देशातील प्रत्येकाचे भविष्य उज्वल आणि सुरक्षित करून देशाला महासत्ता करण्यास हातभार लावण्याची गरज आहे. ‘पैसे, जात आणि राजकीय वारसा’ हे लोकशाहीचे अविभाज्य घटक आहेत हे मुळातच मान्य नसलेली (चुकीची) गृहीतके मनातून काढून, लोकशाहीला पैस्यांच्या व राजकीय नेत्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे कार्य करून आशिष पांडे व त्या सारख्या अनेक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुंडांपासून लोकशाहीला आणि देशाला वाचवण्याचे कार्य आगामी काळात युवकांना करायचे आहे.

लेखक-शिवाजी बळीराम जाधव
मो – ७५८८२१०१४३

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x