मुंबई : मराठा आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सुद्धा याविषयाला अनुसरून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आपले म्हणणे न्यायालयात सविस्तर मांडावे, असे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहेत.
राज्यातील तीन वर्षांपासून रेंगाळलेला बहुचर्चित मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढावा यासाठी विनोद पाटील यांनी सोमवारी सकाळीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संबंधित याचिका दाखल करुन घेऊन न्या. धर्माधिकारी आणि न्या. कोतवाली यांच्या कोर्टाने यावर २१ नोव्हेंबर सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकारकडे मराठा आरक्षणासंदर्भात आलेला महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल याचिकर्त्यांना सुद्धा मिळावा अशी विनंती संबंधित याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे आज सरकार मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
