नवी दिल्ली : जागतिक ख्यातीची भारतीय बॉक्सिंग सुपरस्टार एम. सी. मेरी कोम हीने तिच्या कारकिर्दीतील ६व्या विश्वविजेतेपदासाठी नवी दिल्ली येथील विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याआधी तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने सहज पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली आहे.

तिच्या बॉक्सिंग कारकिर्दीतील हे तिचे ६वे सुवर्ण पदक आणि चॅम्पियनशीपमधील ७वे पदक ठरणार आहे. मेरीकोमने तिचा संपूर्ण अनुभव पणाला लावत ठरलेल्या रणनितीनुसार खेळ केला असं तज्ज्ञांना वाटतं आहे. तिच्या अनुभवाच्या जोरावरच तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५ -० असे धोबीपछाड केले आणि अंतिम फेरी गाठली.

विशेष म्हणजे मागील वर्षी मेरी कोमने आशियाई चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिलाच पराभूत केले होते. दरम्यान, ती खूपच आक्रमक खेळ करत होती असं दिसत होतं. मणिपूरच्या या अनुभवी बॉक्सरने आपल्या अचूक तसेच वेगवान पंचच्या मदतीने पंचांकडून २९-२८, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७ असे गुण प्राप्त केले.

 

Indias boxing star mary kom storms world boxing championships final