5 May 2024 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

मनसैनिकांना 'दंडुका मोर्चा'त 'दडुंका-बंदी' घालून पोलीस दंडुका घेऊन बंदोबस्तावर येणार

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि दुष्काळासारख्या गंभीर मुद्यावर झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी औरंगाबाद येथे भव्य दंडुका मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मोर्चासाठी येताना स्वत: जवळ कोणतेही शस्त्र बाळगू नये याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीमधील सर्व अटींचे तंतोतंत पालन करावे. तसेच कायद्याचा आदर राखावा, असं आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केलं आहे.

वास्तविक देशभर विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि बजरंगदल अशा अनेक हिंदुत्ववादी संघटना मोर्चे आयोजित करताना धारधार हत्यार आणि बंदुका खुलेआम नाचवताना दिसतात. वास्तविक अशा आंदोलनावर कधीही कोणी पोलिसांकडे तक्रार करत नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडण्यासाठी आणि दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर भाजप-शिवसेना सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या या “दंडुका मोर्चात” दंडुक्यावरच आक्षेप घेण्यास सुरुवात केल्याने, पोलिसांनी त्यासाठी मनसेला एक नियमावली आखून दिली आहे.

विशेष म्हणजे जर दंडुकाच वापरायचा नाही तर झेंडा कशाला बांधायचा. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस यंत्रणांना तसा अधिकृत अधिकार असला तरी त्यांना सुद्धा दंडुका घेऊनच बंदोबस्ताचे नियोजन करावे लागणार आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या महत्वाच्या विषयाशी संबंधित आंदोलन असताना काही प्रसार माध्यमच त्यात आडकाठी का आणत आहेत? असा प्रश्न महाराष्ट्र सैनिक आणि आंदोलक शेतकरी विचारात आहेत. परंतु, शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन होणारच असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x