4 May 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

फेक इन इंडिया? सवलत सोडून उलट उद्योगांची वीज १५-२० टक्क्यांनी महागली

ठाणे: केंद्र आणि राज्य सरकारने मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया यांसारख्या योजनांचा कितीही गाजावाजा केला तरी वास्तव मात्र वेगळंच समोर येत आहे . सरकारच्या नव्या नियमानुसार राज्यातील उद्योगांवर वीज कोसळली आहे. कारण विजेचे दर तीन ते सात टक्क्यांनी वाढविल्याचे राज्य महावितरणकडून भासविले जात असले तरी सादर विषयाला अनुसरून बदल करताना औद्योगिक वीज ग्राहकांना मिळणारा ‘पॉवर फॅक्टर इन्सेन्टिव्ह’ सरकारने हुशारीने हिसकावून घेतला असून, उलटपक्षी ‘पॉवर फॅक्टर पेनल्टी’ लादल्याने उद्योगांची वीज तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी महागली आहे असं सत्य समोर येत आहे.

राज्य महावितरणने एकूण तोटा/नुकसान भरून काढण्यासाठी १२ सप्टेंबर, २०१८ रोजी वीज नियामक आयोगाने दरवाढीस मंजुरी दिली होती. त्यामुळे नव्या दरपत्रकाप्रमाणे आकारलेली वीज बिले हाती पडल्यानंतर औद्योगिक वीज ग्राहकांना मोठा धक्का बसला असून त्यांची शुद्ध फसवणूक होत असल्याची भावना आहे. एकूण वीज खरेदीचा खर्च सरासरी ५ रुपये प्रति युनिट असताना उद्योगांच्या पदरी सर्व आकार, अधिभार, क्रॉस सबसीडी आणि दंडासह पडणारी वीज ही तब्बल वीस ते बावीस रुपयांवर पोहोचली आहे असे समजते.

त्यामुळे सरकार मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया यांसारख्या योजनांचा कितीही देखावा करत असले तरी वास्तव वेगळंच असल्याचं उद्योगपतींना वाटू लागलं आहे. त्यामुळे सरकारविरोधात रोष पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x