5 May 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

मनसेच्या आंदोलनाचा शॉक, चौकशीचे आदेश आणि अदानी’च्या वीज दरवाढीस MERC'चा अटकाव

मुंबई : काही दिवसांपूर्वी नियमानुसार ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके आकारणीबाबत अनेक लोकांच्या तक्रारींच्या रीघ लागल्या असताना अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कारभाराकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत होतं. त्यांनतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या नैतृत्वाखाली थेट अदाणींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर अदानी व्यवस्थापनाशी सदर प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा करून लोकांच्या अडचणी तसेच कंपनीकडून होणाऱ्या त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, जर संपूर्ण प्रकरण निकाली न लावल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि शहरभर ते आंदोलन पेटवलं जाईल असा थेट इशाराच अदानी कंपनीला मनसेच्या शिष्टमंडळाने दिला होता. सदर विषय पेट घेणार आणि हा विषय प्रत्येक घराशी निगडित असल्याने त्याचा फटका थेट मुंबई उपनगरातील सत्ताधाऱ्यांना बसू शकतो याची चुणूक लागल्याने भाजप आणि शिवसेना झोपेतून जागे झाले आणि MERC ने ट्विट करून चौकशीचे आदेश देताच आंदोलनाचं श्रेय मनसेला जाऊ नये म्हणून १-२ दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरले.

दरम्यान, प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा गेले आणि हालचाली वाढून ऊर्जामंत्र्यांना सदर प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. आधीच अदानी-अंबानींसोबतच्या संबंधावरून सत्ताधारी राजकीय दृष्टीकोनातून बदनाम असल्याने प्रकरण अधिकच चिघळेल याची सत्ताधाऱ्यांना सुद्धा खात्री होती. त्यामुळे नियमानुसार ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके आकारणीबाबत तक्रारींच्या अनुषंगाने २४ तासात स्पष्टीकरण करा असे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटीला निर्देश देणे भाग पडले असे म्हटले जात आहे.

काय ट्विट केले आहे महाराष्ट्र डिजिआयपीआर’ने?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x