4 May 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

आढावा विधानसभेचा: अंधेरी पूर्व मध्ये 'काटे की टक्कर', भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत मुरजी पटेल यांचं पारडं जड

मुंबई : सध्या अंधेरी पूर्वेचा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. शिवसेनेचे रमेश लटके हे येथील विद्यमान आमदार आहेत. परंतु आगामी निवडणूक मात्र त्यांच्यासाठी जड असल्याचे एकूण चित्र आहे. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचा सारखाच प्रभाव असल्याने हा मतदार संघ काहीसा मिश्र म्हणून परिचित आहे. कोणत्याही एकाच समाजाच्या मतांवर येथे निवडून येणे जवळपास अशक्य आहे. या मतदारसंघात यंदाची विधानसभा लढाई खूपच आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत येथून शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके हेच उमेदवार असतील यात शंका नाही. तर काँग्रेसकडून अजून काही निश्चित नसले तरी माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी हेच उमेदवार असतील असे वृत्त आहे. तर भाजपकडून विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल हेच उमेदवार असतील अशीच शक्यत आहे. भारतीय जनता पक्षाने केलेल्या अंतर्गत सव्हेमध्ये मुरजी पटेल यांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक रमेश लटके जेव्हा २०१४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा मुरजी पटेल हे शिवसेनेत होते. त्यावेळी त्यांची सेवाभावी संस्था जीवन ज्योत प्रतिष्ठानने केलेली जनसेवेची कामं रमेश लटकेंच्या पथ्यावर पडली आणि सुरेश शेट्टींसारखा तगडा काँग्रेस उमेदवार समोर असताना सुद्धा त्यांचा विजय सुकर झाला होता.

परंतु तेच मुरजी पटेल मागील महानगर पालिका निवडणुकीत भाजपमध्ये दाखल झाले आणि ते व त्यांची पत्नी केसरबेन पटेल दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठानचा अंधेरी पूर्वेतील आवाका बघता त्यांचा मार्ग आगामी विधानसभा निवडणुकीत सुकर असेल असं एकूण चित्र आहे. संभाव्य पराभवाची चुणूक शिवसेनेला सुद्धा लागल्याने त्यांनी येथील उत्तर भारतीय नेते गळाला लावायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणजे शिवसेनेचे पहिले उत्तर भारतीय शाखाप्रमुख, माजी नगरसेवक आणि संजय निरुपम यांचे खंदे समर्थक कमलेश राय यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. कमलेश राय यांच्या पत्नी सध्या या मतदारसंघात नगरसेवक आहेत. दरम्यान, कमलेश राय यांनी याच मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आमदारकीची उमेदवारी मागितली होती. त्यानंतर त्यांचे संजय निरुपम आणि सुरेश शेट्टी यांच्याशी संबंध बिघडल्याचे समजते.

त्यामुळे उद्या कमलेश राय यांनी शिवसेनेतून आमदाराची तिकीट मागितल्यास आश्चर्य वाटायला नको. तसे झाल्यास शिवसेनेतच दुफळी माजेल असं समजतं. दुसरीकडे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी अचानक कार्यरत झाले तरी त्यांचा सध्या मतदारांशी संपर्क नसल्यात जमा आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसच्या या मात्तबर नेत्यांपुढे विजयश्री खेचून आणतील असे भाजपकडे नगरसेक मुरजी पटेल हे एकच पर्याय सद्यातरी आहेत. जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या समाजसेवी कामांचा आवाका पाहता ते सर्वच घटकांशी जोडले गेले आहेत. या मतदार संघात जे मतदान होईल ते भाजपाला नसेल, तर ते मुरजी पटेल या व्यक्तीला असेल असं एकूण चित्र आहे.

अंधेरी पूर्वेतील गरीब मुलांना शैक्षणिक मदत, मोफत वैद्यकीय सेवा, महिला कौशल्य प्रशिक्षण केंद्र, रोजगार मेळावे, विविध धर्मियांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम ते जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली ७-८ वर्ष राबवत आहेत. परिणामी ते सर्वच समाजाशी भावनिक दृष्ट्या जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांचं या विधानसभा निवडणुकीत पारडं जड असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x