4 May 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा, केंद्राच्या दबावामुळे?

नवी दिल्ली : आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अखेर आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा देताना, मी वैयक्तिक कारणांमुळे माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून मोदी सरकार आणि आरबीआय दरम्यान एक छुपं युद्ध सुरु आहे. त्याला या वादाचीच पार्श्वभूमी आहे का? अशी शंका व्यक्त करण्यात येते आहे.

दरम्यान, आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करताना त्यांनी म्हटलं की, ‘आरबीआयमध्ये गव्हर्नर पदावरा काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती’. परंतु, आता मी माझ्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत आहे असं म्हटलं आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून मोदी सरकारसोबत झालेल्या वादावरून अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी सुद्धा मोदी सरकारला केंद्रीय बँकेच्या कार्यात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे उर्जित पटेलांचा हा राजीनामा मोदी सरकारविरुद्ध संशयाच वलय निर्माण करत आहे.

तसेच राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः उर्जित पटेल यांची नियुक्ती केली होती. त्याच उर्जित पटेलांनी आता तडकाफडकी राजीनामा दिल्याने मोदी सरकार भोवती संशयाचं वलय निर्माण केले आहे. दरम्यान, त्यावादाच्या पार्श्वभूमीवर १९ नोव्हेंबर रोजी एक बैठक पार पडली होती, ज्यामध्ये RBI आणि मोदी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर वाद मिटल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. परंतु, आता ही बातमी आल्याने काहीच आलबेल नव्हते असं म्हटलं जात आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x