15 December 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ ८ जानेवारीला देशव्यापी संप

Nationwide workers strike on 8th January, Shivsena

मुंबई: केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात शिवसेनेची भारतीय कामगार सेनादेखील सहभागी होणार आहे. शिवसेना व भारतीय कामगार सेना सक्रियपणे या संपात सहभागी होणार असल्यामुळे संपाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे डाव्यांच्या या संपामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना देखील सहभागी होणार आहे. या संपाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी उपस्थिती लावली.

कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या संपात केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, टॅक्सी, रिक्षा, एसटी, बेस्ट, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी कामगार, घर बांधकाम कामगार, महापालिका कामगार आदी क्षेत्रातील, आस्थापनांतील कामगार सहभागी होणार आहेत.

 

Web Title:  Shivsena party workers union will actively participate during Nationwide workers strike on 8th January.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x