6 May 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

भारताचे पंतप्रधान की पाकिस्तानचे राजदूत आहात; ममतांचा मोदींना सवाल

West Bengal CM Mamata Banerjee, PM Narendra Modi, CAA

सिलिगुरी: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. तुम्ही पाकिस्तानसोबत नेहमी भारताची तुलना करता, भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे ब्रॅण्ड अँबॅसिडर आहात, असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदींना केला.

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत? तुम्ही प्रत्येक प्रकरणात पाकिस्तानचा गौरव कशाला करता? देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आम्हाला नागरिकत्व सिद्ध करावं लागणं हे लज्जास्पद आहे असं त्यांनी सांगितले.

गुरुवारी कर्नाटकमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन हे संसदविरोधी आंदोलन असल्याचे म्हटले होते. विरोधकांनी संसदेविरोधात आंदोलन करण्यापेक्षा पाकिस्तानविरोधात आंदोलन करावे असे म्हटले होते. त्यावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले होते. तर, आज शुक्रवारी झालेल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

पुरूलिया येथे सोमवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. तसेच भारतीय जनता पक्षाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. ‘तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचं वचन आहे’ असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.

 

Web Title:  Narendra Modi is Prime Minister of India or Ambassador of Pakistan question by West Bengal CM Mamata Banerjee.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x