5 May 2024 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लोकसभा आढावा: कल्याणमध्ये सेनेच्या शिंदे'शाहीला मनसेच्या पाटील'शाहीकडून सुरुंग लागू शकतो?

कल्याण : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणुका लढवल्याने मोदी लाटेचा थेट फायदा श्रीकांत शिंदे यांना झाला होता. त्यावेळी प्रचारात एकनाथ शिंदे यांनी मोदी लाट असल्याने मोदींच्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुखांकडे हट्ट लावून धरला होता आणि प्रचाराच्या शेवटच्या क्षणी नरेंद्र मोदी यांना कल्याणमध्ये प्रचारासाठी आणून त्यांच्यानावाने मतांचा जोगवा मागितला गेला. परिणामी शिवसेना आणि भाजपची एकत्रित मतं श्रीकांत शिंदे यांच्या खात्यात पडली होती.

परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी आणि मोदींची शिवसेनेसोबत एकत्रित सभा होण्यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात चर्चा होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमोद पाटील या उमेदवाराची. विशेष म्हणजे रोजच्या प्रचारादरम्यान शिवसैनिक सुद्धा प्रमोद पाटील यांची जोरदार हवा असल्याचं छुप्या रीतीने मान्य करत होते. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेसोबतच्या ज्या मोजक्या सभा नरेंद्र मोदी एकत्रित घेणार होते, त्यात एकनाथ शिंदे यांनी कल्याण मतदार संघासाठी आणि मुलाच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंकडे मोदींच्या सभेसाठी शेवटच्या क्षणी हट्ट केला होता आणि तो फलदायी ठरला होता.

त्यानंतर मोदी लाटेत झालेल्या मतदानात सुद्धा मनसेच्या प्रमोद पाटील यांना तब्बल १,२२,३४९ मतं पडली होती. दरम्यान, याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे हे पक्षाच्या ताकदीवर १,९०,१४३ मतं घेऊन गेले होते आणि राष्ट्रवादीत येण्यापूर्वी ते याच मतदारसंघात शिवसेनेचे खासदार असल्याने त्यांचे चांगले नेटवर्क या मतदारसंघात होते. त्याचा फायदा त्यांना २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत झाला होता. परंतु, मागील साडेचार वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. तर २०१४ च्या तुलनेत मनसेने या मतदारसंघात जोरदार पक्ष बांधणी केली असून स्वतः राज ठाकरे, नेते प्रमोद पाटील आणि अभिजित पानसे तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव लक्ष घालत आहेत.

दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील भोंगळ कारभार आणि भाजप-शिवसेना सरकारमधील कुरघोड्यांमुळे या मतदारसंघात भाजप-शिवसेनेबद्दल रोष पाहायला मिळत आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली पोकळ पॅकेजची आश्वासनं गमतीचा विषय बनले आहेत. तसेच निवडणुकीच्या वेळी भर सभेत शिवसेनेच्या राजीनामा-नाट्याचा पहिला प्रयोग करणारे एकनाथ शिंदे सर्वांच्या लक्षात आहेत. या सर्व बाबींचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत नक्कीच जाणवणार आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या २-३ दिवस आधी एखादं राजकीय नाट्य घडवून आणणारे एकनाथ शिंदे यंदा मतदाराच्या पचनी पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे २०१४ मधील निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटीचे गाजर दाखवणारे भाजप-शिवसेनेचे नेते याच शहराला भारतातील सर्वात घाणेरडं शहर संबोधू लागले.

दरम्यान, आगामी निवडणूक शिवसेना आणि भाजप वेगळे लढविल्यास शिवसेना आणि भाजपच्या मतांमध्ये मोठी फूट पडणार हे निश्चित. परंतु, तरी ऐन वेळी लोकसभेसाठी युती केल्यास मतदार अजूनच रोष व्यक्त करेल अशी शक्यता सध्या या मतदारसंघाचा आढावा घेतल्यावर दिसत आहे. या मतदारसंघात प्रमोद पाटील हेच मनसेचे लोकसभेचे उमेदवार असतील यात वाद नाही, परंतु त्यांनी ज्याप्रकारे आणि शांतपणे या मतदारसंघात पक्षबांधणी सुरु केली आहे, त्यावरून ते आयत्यावेळी विरोधकांचा घाम काढतील. त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांची या मतदारसंघावरील पकड सुटली असून, त्यांचा मार्ग खडतर आहे. यासर्व बाबी मनसेच्या पथ्यावर पडणार असून भाजप-शिवसेनेच्या सत्ताकाळाला विटलेला मतदार मनसेकडे आकर्षित होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रमोद पाटील यांचा दिल्लीचा मार्ग सुकर होऊन शिंदेशाही संपुष्टात आल्यास नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x