जकार्ता : इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामीने कहर केला आहे. दरम्यान, या सुनामीममध्ये आतापर्यंत तब्बल ४३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ६०० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ही सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे. जावाचा दक्षिणी भाग तसेच दक्षिणी सुमात्राच्या किनाऱ्यावरील आलेल्या या सुनामीनं शेकडो इमारती अगदी पत्त्यासारख्या खाली कोसळल्या आहेत.

ही सुनामी स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री ९.३० वाजता आल्याची माहिती देशांतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रसिद्ध केली आहे. संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक होऊन समुद्राच्या आत भूस्खलन झालं आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर या लाटांनी सुनामीचं स्वरूप धारण केलं. इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या सुनामीच्या कारणांचा शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यान, इथल्या सरकारी यंत्रणेने मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली आहे. अनक क्रॅकटो हे छोटं ज्वालामुखीचं बेट आहे. १८८३ मध्ये क्रॅकटो ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे हे बेट जन्मास आले होते.

volcano tsunami strikes in indonesia counrty leaving least 43 dead and 100 more are injured