5 May 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

घ्या! शहांना मित्र पक्षाचं नाव माहित नाही आणि मोदी राहुल गांधींची स्मरणशक्ती काढतात

नवी दिल्ली : मागील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी भाषणादरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या एका उमेदवाराचं नाव चुकीचं उच्चारल्याने तो थेट भाषणाचा मुद्दा बनवला होता. त्यावेळी उपस्थित लोकांना मोदी ओरडून ओरडून सांगत होते की बघा काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव सुद्धा माहित नाही. वास्तविक मोदी स्वतः सुद्धा सर्व उमेदवारांची नावं वाचून बोलत असतात, पण मला सर्वकाही माहित आहे अशा अविर्भावात असतात.

परंतु, आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वतःच्या मित्र पक्षाचे म्हणजे एनडीए’चा घटक पक्ष असलेल्या एलजेपी म्हणजे लोक जनशक्ती पक्षाचे नवाच माहित नसल्याचे समोर आले. त्यात भर म्हणजे त्यांच्या बाजूला उभे असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यावरच स्वतःच्या पक्षाचे नाव अमित शहा यांना आठवण करून देण्याची वेळ आली. कारण एलजेपी म्हणजे लोक जनशक्ती पक्षाचे नामकरण त्यांनी आर.एल.एस.पी असं केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राजकीय घटनांनी जोर धरला आहे. त्यानिमित्त बिहारमध्ये सुद्धा एनडीए’दरम्यानचे जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जागावाटपावर आज दिल्लीत या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि जागावाटप निश्चित करण्यात आले आणि त्यावेळी अमित शहा यांना पत्रकारांशी संवाद साधताना मित्र पक्षाचे नाव आठवले नाही.

विशेष म्हणजे स्वतःच्या संबंधित प्रत्येक व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकमार्फत सार्वजनिक करणाऱ्या अमित शहांनी त्यांचा हा व्हिडिओ मात्र त्यांच्या अधिकृत ट्विटर किंवा फेसबुक पेजवर टाकला नाही. सध्या भाजपचे नेते ज्या विषयांवरून राजकारण करत आहेत, ते त्यांच्यावरच पलटत आहे असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x