4 December 2022 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan with Insurance | होम प्रोटेक्शन योजना खरेदी करा किंवा टर्म इन्शुरन्स घ्या, कशी फायदेशीर असेल पहा Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
x

JNU'च्या दर्जाबाबत सरकार तोंडघशी, UPSC IES'मध्ये ३२ पैकी जेएनयूचे १८ विद्यार्थी उत्तीर्ण

JNU, UPSC, IES

नवी दिल्ली: JNU’बाबत भाजपने नेहमीच आक्रमक भूमिका घेत अनेकांनी या विद्यापीठावर बंदी घालण्याची देखील भाषा केली आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना आणि केंद्रातील मंत्र्यांनी देखील जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप वारंवार केला आहे. त्यात भारतीय जनता पक्ष आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच अग्रणी असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात केंद्र सरकार तर जेएनयूला’बाबत नेहमीच दुटप्पीपणानं वागत असल्याचा आरोप विरोधकांनी देखील अनेकवेळा केला आहे.

दरम्यान, सध्या जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनांवर उजव्या संघटना मोदी सरकारवर टीका करत असताना दुसऱ्या बाजूला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील अत्यंत खडतर आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या तसेच यूपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केल्याचे समोर आलं आहे आणि त्यामुळे मोदी सरकार देखील तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या (आयईएस) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सध्या हिंसाचार आणि आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या १८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवलं आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचाच बोलबोला पाहायला मिळाला आहे.

भारतीय अर्थशास्त्र सेवेत देशस्तरावर केवळ ३२ जागा असतात. यातल्या १८ जागा जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या आहेत. यामुळे जेएनयूतल्या शिक्षणाचा दर्जा इतर विद्यापीठांपेक्षा उत्तम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली. यावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

 

Web Title:  18 JNU Students got Selected total 32 seats Indian Economic Services Exam conducted by UPSC Board.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x