12 December 2024 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही; शर्मिला राज ठाकरे देखील मैदानात

Shivsena MLA Ajay Choudhary, Wadia Hospital, Raj Thackeray, Sharmila Thackeray

मुंबई: अत्यंत जुनं आणि लहान मुलांचं स्पेशलिस्ट असलेलं वाडिया रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे वाडियामधील सर्व रुग्ण, कर्माचारी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज लाल बावटा कामगार संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

महापालिका अनुदानाची थकबाकी देत नसल्याने हॉस्पीटल बंद करावे लागणार असल्याचा दावा करणारे वाडिया प्रशासन आणि पालिकेने परस्परविरोधी दावे केले आहेत. मागील आठवड्यापासून वाडिया हॉस्पीटलने नव्या रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रियाही थांबवली आहे. अनुदानाअभावी वैद्यकीय सेवा आणि औषधांसह विविध सेवा देणाऱ्या व्हेन्डर्सना पैसे देता आलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांसह, हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांवरही ‘संक्रांत’ आली आहे.

“वाडिया हॉस्पीटल बंद झालं तर गोरगरीबांनी उपचारासाठी जायचं कुठे? महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. काहीही झालं तरी हे हॉस्पीटल आम्ही बंद होऊ देणार नाही”, असा इशारा शर्मिला ठाकरे यांनी दिला आहे.

शिवसेना आमदार अजय चौधरी शिवडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. तर वाडिया रुग्णालय हे त्यांच्या मतदारसंघात परळ येथे आहे. वाडियातील कर्माचाऱ्यांच्या आंदोलनात शर्मिला ठाकरेंसोबत आमदार अजय चौधरीही सहभागी झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली होती. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह वाडिया रुग्णालयातील कामगार उपस्थित होते. लाल बावटा कामगार संघटनेकडून प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वात वाडिया रुग्णालयाबाहेर ३ दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

Web Title:  Shivsena MLA Ajay Choudhary with Sharmila Raj Thackeray for Wadia Hospital Protest.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x