मुंबई : दिवा येथे वास्तव्यास असणाऱ्या नूतन शेलार या दिव्यांग महिला असून, त्या काही कामानिमित्त घाटकोपर मार्गे अंधेरी वर्सोवा येथे आल्या होत्या. त्यांच्या सोबत कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, अंधेरी येथे मेट्रोने उतरताच त्या वॉशरूमच्या दिशेने जात असताना तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या चालण्याची टिंगल टवाळी करण्यास सुरुवात केली.
सदर दिव्यांग महीलेने आणि त्यांच्या सोबत असलेल्या मुलीने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने अजूनच उर्मटपणा केला. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या इतर सुरक्षा रक्षकांनी सुद्धा त्यांच्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे नूतन शेलार आणि त्यांच्या मुलीने समाज माध्यमांच्या आधारे मनसेचे पालघर येथील महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांच्याकडून सदर विषयावर काही मदत होईल का असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, तुलसी जोशी यांनी कॉलवर विषय समजून घेऊन थेट मुंबई पोलिसांच्या १०० नंबरला संपर्क करत, त्यांना घटनेचे गांभीर्य समजून घेण्याची विनंती केली आणि काही अनुचित घडण्याआधी हालचाल करण्याची विनंती केली. तसेच संबंधित ठिकाणाची सुद्धा माहिती पोलिसांना करून दिली.
त्यानंतर पोलिसांचं पथक तेथे काही वेळातच हजर झालं आणि त्यांनी टिंगल टवाळी करणाऱ्या संबंधित सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, इतक्या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी सुद्धा अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करून तत्परता दाखवणाऱ्या महाराष्ट्र सैनिकाचे सुद्धा संबंधित महिलेने आणि तिच्या कुटुंबाने आभार मानले आहेत.
काय होती ती नेमकी घटना?
