4 May 2024 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अविनाश जाधव व MMRDA अतिरिक्त आयुक्तांची भेट, रखडलेल्या रांजणोली व मानकली उड्डाणपुलांचे काम सुरू होणार

ठाणे : MMRDA च्या माध्यमातून प्रस्तावित आणि मागील ५ वर्षांपासून रखडलेल्या रांजणोली-मानकोली या दोन उड्डाणपुलांचे काम या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असल्याचे आश्वासन MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. मनसे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेतली आणि बैठकीत सर्व विषय तसेच अडचणीचा पाढा वाचला.

सदर विषयाला अनुसरून अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर लवकर रखडलेल्या रांजणोली आणि मानकोली या दोन्ही उड्डाणपुलांचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सविस्तर चर्चेदरम्यान इतर अडचणींचा सुद्धा पाढा अतिरिक्त आयुक्तांसोमर वाचण्यात आला आणि एका निवेदनाद्वारे कारवाई करण्याची विनंती सुद्धा केली.

अविनाश जाधव यांच्या सोबतच्या शिष्टमंडळाने खालील विषयात अतिरिक्त आयुक्तांनी लवकर हस्तक्षेप करून ते तडीस नेण्याची विनंती अतिरिक्त आयुक्तांना केली आहे. त्या बैठकातील ठळक विषय खालील प्रमाणे होते.

  1. सुप्रीम कंपनीचा ठेका रद्द करावा
  2. सुप्रीम कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांचे आर ए बील, बँक ग्यारंटी,इतर कोणतेच पेमेंट देऊ नये
  3. या कामासाठी तात्काळ नवीन ठेकेदार नेमावा
  4. कामाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात दिशा दर्शक लावावेत
  5. संबंधित दोन्ही कामाच्या ठिकाणी सर्व माहिती लावावी. उदा कामाचे नाव, कामाची रक्कम, कामाची मुदत, ठेकेदारचे नाव, संपर्क, अभियंत्यांचे नाव संपर्क
  6. कामाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वार्डन नेमावेत
  7. सदर कामाच्या तक्रारी निवारणासाठी कोण अधिकारी असणार आहेत त्यांचे नाव पद व संपर्क इत्यादी.
  8. दोन्ही कामाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे तिथे दिवसातून 3 वेळा पाणी मारावे व लवकरात लवकर रखडलेल्या रांजणोली व मानकोली या दोन्ही उड्डाणपुलांचे काम सुरू करावे

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या शिष्टमंडळात ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या सोबत प्रदेश उपाध्यक्ष डी.के. म्हात्रे, संपर्क अध्यक्ष महेंद्र बैसाने, भिवंडी लोकसभा संघटक मदन पाटील, भिवंडी शहापुर जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष बालाजी गुळवी आणि ठाणे जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍड. अरूण पाटील आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x