7 May 2025 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन

मुंबईः मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर प्रधान यांचे आज वयाच्या ८३ व्हा वर्षी निधन झाले आहे.

मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन ते थेट जाहिरातींमध्ये किशोर प्रधान यांनी आपल्या अभिनयाने छाप पाडली होती. रसिक प्रेक्षक वर्गाला ते एक विनोदी कलाकार म्हणून परिचित होते. ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ यासारख्या गाजलेल्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकार केल्या आहेत.

याशिवाय, ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील खट्याळ आजोबा, ‘जब वुई मेट’मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम लक्षात राहतील. तसेच, दूरदर्शन वाहिनीवरील तत्कालीन बहुचर्चित गजरा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या