7 May 2025 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

बेस्ट संप, रेल्वे प्रवास आणि उद्धव ठाकरे; व्हॉटसअ‍ॅप-एफबी'वरील तो फेक व्हायरल-चेक

मुंबई : सध्या सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होऊन जगभर पसरेल ते काहीच सांगता येणार नाही. मागील जवळपास ७ दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्टचा संप सुरु असून सामान्यांसाठी मेट्रो आणि ट्रेन हीच परवडणारी प्रवासाची माध्यमं उरली आहेत. परंतु, सध्या याच संपाचा धागा पकडून रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका नेटकाऱ्याने रेल्वेतील प्रवाशाचा फोटो काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.

बेस्ट संप आणि सत्ताधारी पक्षाचे प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा ट्रेनने प्रवास करत असल्याचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, लोकलमधून एक व्यक्ती प्रवास करत असून या व्यक्तीचा चेहरा उद्धव ठाकरे यांच्याशी मिळता जुळता आहे. ‘बेस्ट संपामुळे उद्धव ठाकरे जेव्हा लोकलने प्रवास करतात’ अशा मथळ्यांतर्गत हा फोटो व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर फिरत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या