7 May 2025 2:57 PM
अँप डाउनलोड

७० व्या प्रजासत्ताक दिनी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली : आज ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्ली तसेच संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत आज राजपथावर दिमाखदार संचलन पार पडणार आहे. दरम्यान आजच्या सोहळ्याला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणारं भारतीय लष्कराचं शक्ती प्रदर्शन आणि विविध भारतीय परंपरांचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचं भव्य दर्शन हे आकर्षणाचं मुख्य केंद्र असणार आहे. मुंबई शिवाजी पार्कवर राज्य सरकारचा मुख्य कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या