मुंबई : टाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या शंभर ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून जागा पटकावली आहे. इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने २०१९ मधील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुहाला ८६ व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा १०४ व्या स्थानावर होता. तर अॅमेझॉन कंपनी १३.३६ लाख कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या स्थानावर आहे.
ब्रँड फायनान्सचे कार्यकारी अधिकारी डेव्हिड हेग यांनी सांगितले की, २०१९ मध्ये टाटा समुहाच्या मुल्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७.४ टक्क्यांची वाढ झाली. यामुळे टाटा समुहाने १८ जागांची मजल गाठत ८६ वे स्थान पटकावले.
