26 April 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

LPG Cylinder Price | एलपीजी सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांपेक्षा जास्त वाढल्या | शहरानुसार दर तपासा

LPG Cylinder Price

LPG Cylinder Price | महागाईतून दिलासा मिळेल या आशेवर असलेल्या लोकांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आज १ मे रोजी १०० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर ही वाढ झाली आहे. सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्याच महिन्यात म्हणजे 1 एप्रिल रोजी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

The prices of LPG cylinders have seen an increase of more than Rs 100 today i.e. on 1st May. This increase has happened on commercial LPG cylinders :

19 किलोग्राम एलपीजी सिलेंडर झाला महाग :
आयओसीच्या मते, जर तुम्ही आज दिल्लीत 19 किलोग्रॅमचा एलपीजी सिलेंडर रिफिल करायला गेलात तर तुम्हाला 2355.50 रुपये मोजावे लागतील. ३० एप्रिलपर्यंत केवळ २ हजार २५३ रुपये खर्च करावे लागले. त्याचबरोबर कोलकात्यात २३५१ रुपयांऐवजी २४५५ रुपये, मुंबईत २२०५ रुपयांऐवजी २३०७ रुपये आता खर्च करावे लागणार आहेत. तामिळनाडूत चेन्नईत व्यावसायिक सिलिंडरचे दर २,४०६ रुपयांऐवजी २,५०८ रुपयांवर गेले आहेत.

घेरलू एलपीजी सिलिंडरची किंमत १ मे :
* मुंबई- 949.50 रुपये
* दिल्ली- 949.50 रुपये
* कोलकाता- 976 रुपये

चेन्नई- 965.50 रुपये :
1 मार्च रोजी 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात 105 रुपयांची वाढ झाली आणि 22 मार्चला तो 9 रुपयांनी स्वस्त झाला. त्याचबरोबर ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत 170 रुपयांची वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती. नोव्हेंबर 2021 मध्ये तो 2000 रुपये झाला आणि डिसेंबर 2021 मध्ये तो 2101 रुपये झाला. यानंतर जानेवारीत पुन्हा स्वस्त झाला आणि फेब्रुवारी 2022 रोजी तो 1907 रुपये इतका स्वस्त झाला. यानंतर 1 एप्रिल 2022 रोजी तो 2253 रुपयांवर पोहोचला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: LPG Cylinder Price hiked by 100 rupees check latest rate 01 May 2022.

हॅशटॅग्स

#LPG(13)#LPG Cylinder Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x