18 May 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Amit Shah | अमित शहांच्या गाड्यांचा ताफा प्रथम जाण्यासाठी एका रुग्णवाहिकेला रोखण्यात आलं, मुंबईकरांचा संताप

Amit Shah

Amit Shah | अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर भाजप नेत्यांसोबत त्यांची बैठकही झाली. यावेळी बोलताना अमित शहा यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. तसंच खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचंही वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात अनेक घडामोडी घडल्या. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. दरम्यान, आता एका व्हायरल व्हिडीओची चर्चा होत आहे. यामध्ये अमित शहांच्या गाड्यांचा ताफा जाण्यासाठी एका रुग्णवाहिकेला रोखण्यात आल्याचं दिसून येतंय. यावरून आता टीका केली जात आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले की, मुंबईत असं काही घडेल याची कल्पना तुम्हीही केली नसेल. अमित शहा यांच्या गाड्यांच्या ताफ्याला जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिका रोखण्यात आली. अमित शहा यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. ते व्हीआयपी आहेत, व्हीव्हीआयपी नाहीत. तरीही पहिल्यांदा त्यांच्यासाठी मुंबईतील रस्ते बंद करण्यात आले होते. भाजप सत्तेत आल्यापासून असे प्रकार होत आहेत असंही साकेत गोखले यांनी म्हटलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: For Amit Shah tour ambulance was stopped in Mumbai road check details 07 September 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x