8 May 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल
x

Viral Video | भाजपाची सत्ता असलेल्या यूपीत राज्य कबड्डी खेळाडूंचं जेवण शौचालयात, खेळाडूंसोबत किळसवाणा प्रकार

Viral Video

Viral Video ​​​​| राज्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहारनपूरला आलेल्या महिला खेळाडूंना व्यवस्थित जेवणही मिळालं नाही. त्यांना दुपारच्या जेवणात कमी शिजवलेला भात देण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अनेक खेळाडूंना चापत्याही मिळाल्या नाहीत. अशा परिस्थितीत अनेक स्पर्धकांनी भाजी आणि सॅलडवर समाधान मानलं. धक्कादायक म्हणजे भात आणि पुरी तयार करून त्या शौचालयात ठेवण्यात आल्या होत्या, जिथे अति दुर्गंधीमुळे उभे राहणेही कठीण होते.

उत्तर प्रदेश क्रीडा संचालनालयाच्या अधिपत्याखाली उत्तर प्रदेश कबड्डी असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय सबज्युनिअर मुलींची स्पर्धा आयोजित करण्याची संधी सहारनपूरला मिळाली होती. येथील डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत १७ मंडळांचे संघ आणि एका स्पोर्ट्स होस्टेलचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्टेडियममध्येच करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे स्विमिंग पूल परिसरात जेवण तयार केले जात आहे. तसेच महिला स्पर्धकांच्या चेंजिंग रूम मध्ये आणि टॉयलेटमध्ये कच्चे रेशन ठेवले होते. इथेच विटांची चूल बनवून जेवण तयार केलं गेले आणि ते तयार करून झाल्यावर शौचालयात ठेवलं जायचं. शौचालयातील फरशीवर कागद ठेवून त्यावर भाताच्या पराती आणि पुऱ्या ठेवल्याचे आढळले. खेळाडूंना कच्चा भात देण्यात आला, जो अनेक खेळाडूंनी खाण्यास नकार दिला. या किळसवाण्या प्रकारामुळे योगी सरकारच्या कारभाराचा दर्जा समोर आला आहे. त्यामुळेच राज्यात धार्मिक मुद्दे नेहमी पेटते ठेऊन राज्यातील मूळ मुद्यांना बगल देण्याचे प्रकार सत्ताधारी करत असतात असं म्हटलं जातंय.

Uttar Pradesh

UP Yogi

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Uttar Pradesh Saharanpur players food found kept in the toilet room check details 20 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x