29 April 2024 2:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Viral Video | मोदींच्या मार्केटिंगचं साधन झालेल्या वंदे मातरम ट्रेनचा दर्जा तरी काय? कधी गाईच्या धडकेने ट्रेन तुटतेय, आता ट्रेनच्या आत पाऊस

Rain Inside Vande Mataram Train

Viral Video | सध्या देशातील वंदे मातरम ट्रेन ही मोदींच्या इव्हेन्ट मार्केटिंगचं साधन झाल्याचं वारंवार पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी एका गाईच्या धडकेने वंदे मातरम ट्रेन तुटली होती. यामध्ये गाईचा मृत्यू झाला होता, पण गाईच्या धडकेने वंदे मातरम ट्रेन तुटणं हा अजब दर्जाचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी सुद्धा मोदी सरकारवर या ट्रेनच्या दर्जावरून टीका झाली होती. मात्र आता अजून त्यापुढचे दर्जा सिद्ध करणारे प्रकार समोर येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे याची किंमत आता ट्रेनमधील प्रवाशांना मोजावी लागत आहे.

काँग्रेसने सोशल मीडियावर ट्रेनची एक पोस्ट टाकली आहे. या व्हिडिओमध्ये वंदे मातरम रेल्वेच्या डब्यात पावसाचं पाणी पडताना दिसत आहे. एक कर्मचारी पडणाऱ्या पाण्याखाली प्लॅस्टिकचे डबे ठेवताना दिसत आहे. रेल्वेच्या डब्यात काही प्रवासी बसलेले दिसत आहेत.

केरळ काँग्रेस च्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओचे वर्णन वंदे भारत एक्सप्रेस असे केले जात आहे. हा व्हिडिओ सुमारे 8 सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ कोणत्या ट्रेनचा आणि केव्हाचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

ट्विटरवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांचे लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. देशातील वंदे भारत गाड्यांची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावर पूर्ण भर देत आहे असं मोदी सरकारने म्हटलं होतं, पण वास्तविक सरकार ते करतंय का अशी शंका येऊ लागली आहे.

काँग्रेस केरळच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पावसादरम्यान ट्रेनच्या छतावरून पाणी पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. रात्री 10.30 वाजेपर्यंत 61 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओला दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले होते. सरकार सातत्याने वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवत आहे. 26 जूनपासून 5 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सेमी हायस्पीड ट्रेनचा शुभारंभ करणार आहेत. मात्र असाच दर्जा राहिला तर मोदी सरकारच्या दिखाव्याचा फज्जा उडू शकतो असं म्हटलं जातंय.

News Title : Rain Inside Vande Mataram Train Video trending on social media check details on 16 June 2023.

हॅशटॅग्स

#Rain Inside Vande Mataram Train(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x