15 May 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Business Idea | कोणत्याही गुंतवणूकीशिवाय दरमहा लाखोंची कमाई करू शकता, शहर किंवा गावात आधार कार्ड फ्रँचायजी सुरु करा

Business Idea

Business Idea | तुम्हालाही गुंतवणूक न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही कोणत्याही गुंतवणूकीशिवाय दरमहा लाखोंची कमाई करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक न करता भरपूर कमाई करू शकता.

सरकारी कंपन्यांची फ्रँचायजी उघडून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. आपल्याला या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही आणि नफा देखील चांगला आहे. तसेच नुकसान होण्याची शक्यताही नगण्य आहे. सरकारी फ्रँचाइझींसोबत काम करण्याची मजा वेगळी असून कमाईही बंपर आहे.

आधार कार्ड फ्रेंचाइजी :
आजकाल देशात राहणाऱ्या प्रत्येकासाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामुळे याला खूप मागणी असते. तुम्ही आधार कार्ड फ्रँचायझी घेऊ शकता. यामुळे तुम्ही खूप चांगली कमाई करू शकाल. तुम्हाला आधार कार्डची फ्रँचायजी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधी यूआयडीएआयने घेतलेल्या परीक्षेत पास व्हावं लागेल.

यानंतर सर्व्हिस सेंटर उघडण्याचा परवाना दिला जातो. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी लागते. यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमधून नोंदणी करावी लागणार आहे. अशावेळी आधार कार्ड अत्यंत काळजीपूर्वक ठेवावे लागते. तसेच यात काही चूक झाली तर ती दुरुस्त करून घेण्यासाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा यूआयडीएआय फ्रँचाइझीमध्ये जाऊ शकता. तुम्ही आधार कार्ड फ्रँचायजीही घेऊ शकता.

अर्ज कसा करावा ते जाणून घ्या:
१. आधार फ्रेंचायझी परवाना मिळवण्यासाठी सर्वात आधी एनएसईआयटी https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. येथे तुम्हाला ‘क्रिएट न्यूज युजर’चा पर्याय मिळेल.
३. यामध्ये तुम्हाला ‘एण्टर शेअर कोड’ असं विचारलं जाणार आहे. ‘शेअर कोड’साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करावा लागतो.
४. डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ‘एक्सएमएल फाइल’ आणि ‘शेअर कोड’ दोन्ही डाऊनलोड कराल.
५. अर्ज करताना तुमच्या स्क्रीनमध्ये एक फॉर्म ओपन होईल. त्यात जी काही माहिती मागितली आहे ती भरून ती सबमिट करा.
६. तुमच्या फोन आणि ई-मेल आयडीवर ‘युजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ दिसेल. आता या आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही ‘आधार टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन’च्या पोर्टलवर सहज लॉग इन करू शकता. यानंतर ‘कंटिन्यू’चा पर्याय तुमच्यासमोर येईल, त्यावर क्लिक करा.
७. पुढच्या चरणात तुमच्यासमोर पुन्हा एक फॉर्म उघडेल. मागितलेली संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर तुमचा फोटो आणि डिजिटल सिग्नेचर अपलोड करा. यानंतर पुन्हा तुम्ही सर्व माहिती योग्य प्रकारे भरली आहे की नाही हे तपासून पाहा, त्यानंतर ‘प्रोसीड टू सबमिट फॉर्म’वर क्लिक करून पुढे जा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Business Idea of Aadhaar Card Franchise check details 27 September 2022. 

हॅशटॅग्स

#Business Idea(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x