12 December 2024 8:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांचा खास शेअर 50% स्वस्त झालाय, आता सकारात्मक बातमीमुळे शेअरची किंमत वाढतेय

Nazara Technologies Share Price

Nazara Technologies Share Price | ‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ या गेमिंग कंपनीने मोठा करार केल्याची घोषणा केली आहे. या करारा अंतर्गत ‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनी आपल्या ई-स्पोर्ट्स कंपनी ‘नॉडविन इंटरनेशनल पॉटीई लिमिटेड’ मार्फत सिंगापूरस्थित लाईव्ह इव्हेंट फर्म ‘ब्रेडेड पी.टी.ई’ मधील 51 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे. ‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या ई स्पॉट्स विभागामध्ये ‘नॉडविन गेमिंग’ आणि ‘स्पोर्टसकिडा’ सामील आहेत. ही बातमी येताच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने 3 टक्क्यांची उसळी घेतली. आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 549.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Nazara Technologies Limited)

शेअरची ट्रेडिंग किंमत :
‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचे आज 0.16 टक्के वाढीसह 549.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 20 मार्च 2023 रोजी ‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 481.95 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 6 एप्रिल 2022 रोजी हा स्टॉक 884.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. ‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,520,79 कोटी रुपये आहे.

कंपनीचे तपशील :
‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे IPO शेअर्स 79 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ‘नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या IPO शेअरची इश्यू किंमत 1101 रुपये जाहीर करण्यात आली होती. आणि शेअर 1926.75 रुपये किमतीवर लिस्ट झाला होता, आणि दिवसभराच्या व्यवहारात शेअरने 1971 रुपये किंमत स्पर्श केली होती. सध्या हा स्टॉक आपल्या लिस्टिंग किंमतीपासून 73 टक्के घसरला आहे. कंपनीने जून 2022 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस इक्विटी शेअर्स देखील वाटप केले होते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
नझारा टेक्नॉलॉजी कंपनी ही भारतातील आघाडीची गेमिंग कंपनी मानली जाते. इंटरएक्टिव्ह गेमिंग स्पोर्टस व्यतिरिक्त, ही कंपनी गेमिंग इको सिस्टम बावण्याचे काम देखील करते. ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनी भारत, आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व देशांमध्ये आपले उत्पादन विकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nazara Technologies Share Price on 06 April 2023.

हॅशटॅग्स

#Nazara Technologies Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x