मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात इंडियन प्रीमिअर लीगही अर्थात आयपीएलच्या १२ व्या हंगामाचे सामने देखील रंगणार आहेत. आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २३ मार्चपासून सुरू होणा-या लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे एकमेकांसमोर ठाकणार आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात ठेवता २३ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत पहिल्या २ आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार आहे. मे-जून मध्ये होणा-या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. २३ मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा BCCI ने केली होती. IPL दरम्यान भारतामध्ये लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामने भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती.

ipl 2019 schedule for first 2 weeks has been declared