2 May 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

अमित शहा पाकच्या पाण्यात झोपले की पाकिस्तानचं पाणी बंद होणार का? राज ठाकरेंचा टोला

Ajit Doval, Raj Thackeray

कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या काळात अगदी नोटबंदीपासून ते पुलवामा हल्ल्यापासून सर्वच गंभीर विषयांमधील वास्तव उघड करायचं असेल तर आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची सखोल चौकशी करा, म्हणजे सगळंच सत्य समोर येईल असं खबळजनक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. निवडणुका जवळ येतील तशा मोठ्या घटना घडवल्या जातील आणि तुमचं लक्ष त्याकडे वळवलं जाईल. नोटाबंदी, राफेल प्रकरण जनता विसरावी यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे जनतेनं जागं राहावं, असंही त्यांनी नमूद केलं. अनेक विरोधकांनी यापूर्वी अजित डोभाल यांच्या मुलाची पाकिस्तानी कंपनीत गुंतवणूक आणि पार्टनरशिप असल्याचा आरोप केला होता.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद हे राजकीय बळी आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा खळबळजनक दावा त्यांनी कोल्हापुरातील सभेत केला.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x