3 May 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

१३वा वर्धापनदिन: मनसे आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर? सविस्तर

Raj Thackeray, Amit Thackeray, MNS, Maharashtra Navnirman Sena, Nitin Nandgaonkar, Tulsi Joshi

मुंबई : मागील सगळ्याच मोठय़ा निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. असं असलं तरी मनसे किती आणि कोणत्या जागा लढवेल, हे अजून स्पष्ट समजू शकलेलं नाही, पण महाराष्ट्र सैनिकांचा ‘जोश’ आणि मनसेच्या मतदारांचा उत्साह विधानसभेपर्यंत कायम ठेवण्यासाठी रिंगणात उतरण्याची तयारी ‘कृष्णकुंज’वर सुरू झाली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा आज मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनी स्वत: राज ठाकरेच करतील असे समजते. तर ते महाराष्ट्रात काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याची देखील शक्यता आहे.

मागील २-३ वर्षापासून राज ठाकरे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर टीकेची झोड उठवताहेत. जाहीर भाषणांमधून आणि व्यंगचित्रांमधून ते मोदी सरकारला फटकारत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, बुलेट ट्रेन इथपासून ते अगदी पुलवामा हल्ला आणि ‘एअर स्ट्राईक’ पर्यंतच्या घडामोडींवरून त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. मोदी-शाह जोडीच्या पराभवासाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केले होते. या महाआघाडीत जायला ते ‘मनसे’ तयार होते. राष्ट्रवादीचे नेते त्यांना घ्यायलाही अनुकूल होते; मात्र काँग्रेसने विचारसरणीच्या बहाण्याने लाल कंदील दाखवला आणि ‘राजमार्ग’ बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नकार-होकारात बराच वेळ गेला. तो पर्याय बाद झाल्यानं, आता पुढे काय, हा प्रश्न तमाम मनसैनिकांना पडला आहे. त्याचं उत्तर राज ठाकरे यांनी शोधलंय आणि ते उद्या स्वबळाचा नारा देऊ शकतात, असं आमच्या पक्षातील सूत्राने सांगितलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मनसेची चांगली ताकद आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच राज्याचा दौरा करून महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि त्यांना मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता. त्यावेळी अनेक भागांमध्ये त्यांना लोकसभेत देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे. मनसे निवडणूक रिंगणात न उतरल्यास या पाठिराख्यांचा उत्साह मावळू शकतो. कार्यकर्त्यांचं मनोबलही डळमळू शकतं. त्यामुळेच राज पुन्हा एकदा स्वत:ची ताकद अजमावण्याच्या तयारीत आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही, रिंगणात उतरायचं का, याबाबत राज ठाकरे संभ्रमात होते. तेव्हा त्यांचा नरेंद्र मोदींना ‘शत प्रतिशत’ पाठिंबा होता; परंतु अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी आपले मोजकेच शिलेदार मैदानात उतरवले होते. निवडणुकीत मोदी लाट उसळूनही काही मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना चांगली मतं मिळाली होती. ती या निवडणुकीत नक्कीच वाढतील आणि भाजप-शिवसेना युतीला तगडं आव्हान देता येईल, असं गणित मनसे नेतृत्वानं बांधलंय. जिथे मनसेचा उमेदवार नसेल, तिथे आघाडीच्या उमेदवाराला बाहेरून पाठिंबा देण्याची ‘पॉवर’फुल्ल ‘राज’कीय खेळीही खेळली जाऊ शकते.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x