4 May 2024 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सुजयला निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो - अजित पवार

NCP, bjp maharashtra, ajit pawar, sujay vikhe patil, sharad pawar, election 2019

पुणे : काल पुण्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी सुजय विखे पाटलांवर सनसनाटी आरोप केला. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो, परंतु सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. सुजयला आता माझ्या समोर आणा, हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे.

सुजय यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावे असे त्यांना मी स्वत: सांगितले होते पण त्यांनीच या प्रस्तावाला नकार दिल्याने आमचाही नाईलाज झाला, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

शरद पवार हे पन्नास वर्षे सक्रीय राजकारणात आहेत. त्यांनी माढ्यातून माघार घेतली कारण राज्यसभेची मुदत 2020 पर्यंत आहे ती जागा विनाकारणच इतरांना द्यावी लागली असती. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असेही पवार म्हणाले. हवेचा रोख बघून शरद पवारांनी माघार घेतल्याचा आरोप निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. ज्यांच्या नावावर अनेक जण निवडून येतात, त्यांच्या बाबत असे विधान करणे चुकीचे आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x