3 May 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड
x

मोदींच्या घरात करोडो रुपये, आयकर विभाग कारवाई करेल काय?

Loksabha Election 2019, MK Stalin, Narendra Modi

चेन्नई : लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने आता प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच तामिळनाडूमधील द्रविड मुनेत्रा काझगम अर्थात (डीएमके) पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी भारताच्या आयकर विभागाला थेट आव्हान देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. जर आयकर विभागाने नरेंद्र मोदी यांच्या घरी छापे टाकावेत, असे एमके स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

कोयंबतूरमधील एका प्रचारसभेत लोकांना संबोधित करताना एमके स्टॅलिन यांनी मोदींना तिखट शब्दात लक्ष केले. यावेळी, एमके स्टॅलिन म्हणाले, ‘आयकर विभाग सांगत आहेत की संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच दुमई मुरगन यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. परंतु असे असेल तर नरेंद्र मोदींच्या घरी किती करोडो रुपये असतील, असे मी सांगितले. तर तुम्ही त्यांच्या घरावर तसाच छापा टाकणार काय? असा थेट सवाल एमके स्टॅलिन यांनी आयकर विभागाला केला आहे.’

उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांचा मुलगा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. यंदाच्या लोकसभा निडणुकीसाठी त्यांच्या पार्टीकडून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप करत एमके स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी किंवा उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्यावर सुद्धा आयकर विभाग छापा टाकणार का, असा प्रश्नही यावेळी भर सभेत विचारला.

मागील काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या काळात पैशांचा बेकायदा वापर होत असल्याच्या संशयावरुन DMKचे खजिनदार दुमई मुरुगन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. यावेळी त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची रोक रक्कम जप्त करण्यात आली होती. याशिवाय, कर्नाटकातील काही नेत्यांच्या घरांवर सुद्धा एकाचवेळी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्याआधी अशाप्रकारे कारवाई करुन सरकारी यंत्रणेचा केंद्र सरकार चुकीचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x