पालघर : लोकसभा निवडणुका जाहीर होताच पालघरमध्ये सुद्धा स्वतःच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सी खेच सुरु झाली आहे. त्यासाठी निरनिराळा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक प्रस्त म्हणून संबंधित समाजात विशेष स्थान असलेल्या व्यक्तींना स्वतःकडे खेचण्याचा सर्वच पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न असतो. संपूर्ण पालघर जिल्ह्यात कातकरी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा समाज निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतो.
त्या अनुषंगाने कातकरी समाजामध्ये आदराचं स्थान असलेले आणि आदिवासी बहुजन पर्यावरण या सेवाभावी संस्थेच्या मार्फत सर्व धर्मातील आणि सर्व जातीच्या लोकांशी जोडले गेलेले नारायण सावरा यांनी स्वतः आमदार हितेंद्र ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या समाजाचं प्राबल्य असलेल्या गावांमध्ये नारायण सावरा स्वतः बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.
अर्थात याचा मोठा फायदा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला हे निश्चित आहे. तसेच २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणारे नारायण सावरा यांनी हजारोच्या संख्येने मतं खेचली होती. नारायण सावरा हे बहुजन समाजात स्वच्छ चेहरा म्हणून परिचित असून, त्यांना समाजात विशेष आदराचं स्थान आहे आणि त्याचा निश्चित फायदा हा बहुजन विकास आघाडीला होणार, असं म्हटलं जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीत यंदा काटे की टक्कर होणार असल्याने, प्रत्येक मत हे लाख मोलाचे असणार आहे. दरम्यान नारायण सावरा यांच्या आजच्या सदीच्छा भेटीवेळी, स्वतः आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते.
