19 May 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर धडाम झाले, तपासून घ्या तुमच्या शहरातील आजचे कोसळलेले सोन्याचे नवे दर

Gold Price Today

Gold Price Today | देशात आज अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. याआधी शुक्रवारी सोन्याच्या स्पॉट किमतीत मोठी घसरण झाली होती. मात्र तरीही 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ही 59,900 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर राहिला आहे. जाणून घेऊयात शुक्रवारी काय होते सोने-चांदीचे भाव.

अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 425 रुपयांनी घसरून 60,191 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,460 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 460 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 59,950 रुपयांवर आला आहे. 20 एप्रिल 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 60,373 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

आठवडाभरात सोनं झालं इतकं स्वस्त
17 एप्रिल 2023 ते 21 एप्रिल 2023 या आर्थिक सप्ताहात 999 गुणवत्तेच्या म्हणजेच 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत एकूण 438 रुपयांची घसरण झाली आहे. तर 995 क्वालिटी म्हणजेच 22 कॅरेट सोन्याच्या दरात याच कालावधीत प्रति 10 ग्रॅम 436 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भारतात सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीया लक्षात घेऊन देशातील सर्व ज्वेलर्स भरपूर तयारी करतात आणि अनेक ऑफर्सही देतात.

चांदीही स्वस्त झाली आहे
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी चांदीचा भाव ६४६ रुपयांनी घसरून ७४,७७३ रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात सोने 75,419 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 22 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x