नवी दिल्ली : साल १९८४ साली दिल्लीत झालेली शीख दंगलीप्रकरणी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शीख समुदायात संताप निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. शीख समुदायाने दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घराबाहेर आंदोलन करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली.
राहुल गांधींनी यासंदर्भात फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला वाटतंय सॅमजींनी जे काही वक्तव्य केलं त्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागायला हवी. १९८४मध्ये जे झालं ती एक भयानक आणि निंदनीय घटना होती. त्याबाबत न्याय मिळणं अजून बाकी आहे. त्या घटनेतील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माझी आई सोनिया गांधी यांनी यासंदर्भात माफीही मागितली आहे. आम्हाला हेच वाटतंय की १९८४ मध्ये जे झालं ते भयानक होतं जे कधीच व्हायला नव्हतं हवं.
