पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतरची आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर पुढील सरकारचे नेतृत्व काँग्रेस करेल. परंतु युपीएच्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या बाजूने सहमती नसेल तर दुसऱ्या कोणत्या पक्षाचा पंतप्रधान बनू देणार नाही, अशी भूमिका काँग्रेस घेणार नसल्याचं यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत यूपीतून भारतीय जनता पक्षाला तब्बल ७३ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ १० ते १५ जागा मिळू शकतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीए विरोधातील पक्ष एकत्र येऊन भाजपाविरोधात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

मागील आठवड्यातही कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसला २७२ जागा जिंकता येणार नाहीत, हे आम्हाला आधीच माहित आहे. तसेच, भारतीय जनता पक्षाला १६० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. पण, काँग्रेस प्रणित आघाडीचेच सरकार येईल असं विधान केलं होतं. त्यामुळे २३ मे रोजी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं.

एनडीए सरकार जाणं महत्वाचं; पंतप्रधान इतर पक्षाचा होण्यास आमची हरकत नाही: काँग्रेस