15 May 2024 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Ajit Pawar | अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या राजकीय आयुष्याची माती होणार? मतदारांचा शरद पवारांवर विश्वास कायम - सर्व्हे

Ajit Pawar

Ajit Pawar | शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवार मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार काल नाशिकमध्ये दाखल झाले होते. येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार यांची जाहीर सभा घेतली आणि त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या छगन भुजबळ यांचे देखील धाबे दणाणले आहेत.

आता ‘सी व्होटर’ या संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणाने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अजूनही शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे.

प्रश्न: तुमच्या मते राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण?

तुमच्या मते राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण,’ असा प्रश्न ‘सी व्होटर’कडून राज्यातील जनतेला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तब्बल ६६ टक्के लोकांना शरद पवार यांच्या बाजूने, तर केवळ २५ टक्के लोकांनी अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. तसंच ९ टक्के लोक अजूनही संभ्रमात असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. त्यामुळे तब्बल ७५ टक्के जनता अजित पवार यांच्या विरोधात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जनतेचा कल पुन्हा शिंदे गटाच्या बाबतीत दिसला होता असाच कल आता अजित पवारांच्या बाबतीतही दिसतो आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आमदार आणि पक्षातील पहिल्या फळीतील दिग्गज नेत्यांच्या साथीने पक्ष काबीज करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरीही अजूनही जनता मात्र शरद पवारांच्या बाजूने असल्याचं दिसत आहे.

शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीला उभारी देऊ शकतील का?

ज्या नेत्यांना पक्षाच्या स्थापनेपासून मोठमोठी पदे दिली, तेच नेते दुरावल्याने शरद पवार हे राजकीय संकटात सापडले आहेत. मात्र तरीही ८३ वर्षीय शरद पवार पुन्हा लढण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. अशा स्थितीत ते पुन्हा पक्षाला उभारी देऊ शकतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र या प्रश्नावरही जनतेने सकारात्मक कौल दिला असून ५७ टक्के लोकांना शरद पवार हे पुन्हा राष्ट्रवादी जोमाने उभी करण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास वाटत असल्याचं सी व्होटरचा सर्व्हे सांगत आहे. तर ३७ टक्के लोकांना ही शक्यता प्रत्यक्षात येईल, असे वाटत नाही. म्हणजे इथेही ६३ टक्के लोकांना आजही शरद पवारांवर विश्वास असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच ६ टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं आहे.

News Title : Ajit Pawar Camp C Voter Survey check details on 09 July 2023.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x