19 May 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी खुशखबर! मजबूत परतावा देतेय 33 रुपयांपासूनची ही गुंतवणूक, फायदाच फायदा

Bank of Maharashtra Share Price

Bank of Maharashtra Share Price | सध्या शेअर बाजारात तिमाही निकाल जाहीर करण्याचा सीजन सुरू झाला आहे. अनेक कंपन्या आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर कर आहेत. नुकताच बँक ऑफ महाराष्ट्रने देखील आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून 2023 तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात तब्बल 95 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. यासह बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता देखील सुधारली आहे. शुक्रवार दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 0.15 टक्के वधारून 33.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअरची टार्गेट प्राईस :

तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक 3 महिन्यांच्या कालावधीसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मागील या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक 34.25 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाला होता. ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक 32.50-33.50 रुपये किमतीमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 39 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुंतवणूक करताना तज्ञांनी स्टॉकवर 29 रुपयेच स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 36.25 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 16.15 रुपये होती.

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर कामगिरी :

मागील एका आठवड्यात बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉकची किंमत 10 टक्के, एका महिन्यात 24.54 टक्के, तीन महिन्यांत 26 टक्के, मागील सहा महिन्यात 14.60 टक्के, मागील एका वर्षात 102.10 टक्के आणि मागील तीन वर्षांत 187 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या बँकिंग स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शेअरची आतापर्यंतची सर्वकालीन उच्चांक किंमत 96.5 रुपये होती. तर सध्या हा स्टॉक आपल्या सर्व कालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 65 टक्के कमजोर झाला आहे. 13 मार्च 2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक 7.71 रुपये या सार्वकालीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

बँक ऑफ महाराष्ट्र जून तिमाही निकाल :

आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाहीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने मागील वर्षीच्या याच तिमाही काळातील नफ्याच्या तुलनेत 95.19 टक्के वाढीसह 882 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रचा ऑपरेटिंग नफा 55.04 टक्क्यांच्या वाढीसह 1863 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 38.80 टक्क्यांच्या वाढीसह 2340 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. जून तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रची निव्वळ व्याज मार्जिन 3.86 टक्केवर पोहोचलो आहे. तर बँकेची एकूण व्यवसायीक उलाढाल 24.84 टक्‍क्‍यांच्या वाढीसह 420041 कोटी रुपयेवर पोहोचली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एकूण ठेवी 24.73 टक्क्यांच्या वाढीसह 244365 कोटी रुपयेवर पोहोचल्या आहेत. आणि बँकेचे CASA प्रमाण 50.97 टक्के नोंदवले गेले आहे.

मालमत्ता गुणवत्ता :

बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्रॉस एनपीए मागील वर्षीच्या तुलनेत 3.74 टक्क्यांवरून घसरून 2.28 टक्के नोंदवला गेला आहे. तर बँकेचा निव्वळ एनपीए मागील वर्षीच्या 0.88 टक्क्यांवरून घसरून 0.24 टक्के नोंदवला गेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचा मालमत्तेवरील परतावा मागील वर्षीच्या 0.81 टक्क्यांवरून वाढून 1.33 टक्के नोंदवला गेला आहे. तर बँकेचे इक्विटी शेअरवरील रिटर्न्स माहिल वर्षीच्या 16.75 टक्केवरुन वाढून 23.73 टक्के नोंदवले गेले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bank of Maharashtra Share Price today on 05 August 2023.

हॅशटॅग्स

Bank Of Maharashtra Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x