10 May 2025 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींचा राजीनामा एकमताने फेटाळला

Congress, Rahul Gandhi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर दिल्लीत आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. परंतु कार्यकारणी एकमताने राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर जोरदार चिंतन करण्यात आलं. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बैठकीबाबत पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी मी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. परंतु हा राजीनामा एकमताने फेटाळून लावला. तसेच काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींना देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या