14 May 2024 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी विशिष्ट 'भगवी यात्रा' पॅटर्नमध्ये हिंदू-मुस्लिम तेढ वाढवलं जातंय, आता हरियाणा, सैन्य तैनात

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येतं आहेत आणि ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे त्याच राज्यांमध्ये एका पॅटर्न प्रमाणे हिंदू-मुस्लिम वाद आणि दंगली घडत असल्याने संशय बळावत चालला आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे तिथे आगामी लोकसभा निवडणुकीत फटका बसण्याची दाट शक्यता आहे तिथे हिंदू-मुस्लिम वाद पेट घेतं आहेत हे विशेष म्हणावे लागेल. उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात असे प्रकार समोर आले होते. आता भाजपाची सत्ता असलेल्या हरियाणात तीच मालिका सुरु झाली आहे.

हरियाणातील नूंह जिल्ह्यात सोमवारी दुपारी भगवा यात्रेदरम्यान हिंसाचार उसळला. जिल्ह्यातील नल्हाड महादेव मंदिरातून भगवी यात्रा सुरू होऊन झंडा पार्कयेथे पोहोचताच मुस्लिम पक्षांच्या एका गटाने दगडफेक विरोध केला. यानंतर हिंदू संघटनांचे लोकही संतप्त झाले आणि प्रत्युत्तरा दाखल दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. हा हिंसाचार इतका तीव्र झाला की, स्थानिक पोलिस कमी पडत असल्याचे दिसताच सैन्य दल पाठविण्यात आलं असून, परिस्थिती हाताळण्यासाठी इंटरनेटही काही काळासाठी बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नसीर आणि जुनैद यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी मोनू मानेसर याने एक व्हिडिओ जारी करून आपण मेवातमध्ये येणार असल्याचे सांगितले होते. या यात्रेत सहभागी होणार असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर या व्हिडिओमुळे काही लोक संतापले असून ते यात्रेवर हल्ल्यासाठी तयार असल्याची चर्चा जोर धरू लागली. दगडफेकी बरोबरच गोळीबाराचीही बातमी आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात दोन्ही बाजूचे उपद्रवी लोक बस आणि इतर वाहनांची तोडफोड करताना दिसत आहेत.

News Title : Lok Sabha Election 2024 Haryana Hindu Muslim Crisis check details on 31 July 2023.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2024(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x