12 December 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO
x

Sarkari Bank Shares | पैसा सरकारी बँकेच्या FD मध्ये अडकला? पंजाब नॅशनल बँक शेअरची टार्गेट प्राईस पहा, 85 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय

Sarkari Bank Shares

Sarkari Bank Shares | पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकेचे शेअर्स गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी 1 टक्क्यांनी कमजोर झाले होते. या PSU बँकेने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. आज देखील या बँकिंग स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. पंजाब नॅशनल बँकचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर चार पट अधिक नोंदवला गेला आहे. तिमाही निकालानंतर आज पंजाब नॅशनल बँक या सार्वजनिक बँकेच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली आहे.

अनेक दिग्गज ब्रोकरेज हाऊसने पंजाब नॅशनल बँके स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात या बँकिंग शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 85.03 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी पंजाब नॅशनल बँक स्टॉक 0.24 टक्के घसरणीसह 61.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मॉर्गन स्टॅनली फर्मने पंजाब नॅशनल बँक स्टॉकवर ‘अंडरवेट’ रेटिंग देऊन स्टॉक 55 रुपयेपर्यंत खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मात्र पंजाब नॅशनल बँकचा निव्वळ नफा अपेक्षेपेक्षा कमी नोंदवला गेला आहे. कर्मचारी खर्च आणि क्रेडिट खर्चात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आहे. बुडीत कर्जांमध्ये तिमाही आधारावर घट पाहायला मिळाली आहे. तर रिस्क रेवॉर्ड क्षमता स्पर्धक कंपनीच्या तुलनेत सकारात्मक आहे.

जेफरीज फर्मने पंजाब नॅशनल बँक स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग देऊन स्टॉकची लक्ष किंमत 66 रुपये जाहीर केली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे, म्हणून जेपी मॉर्गन फर्मने पीएनबी स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर करून 72 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

पंजाब नॅशनल बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. एकत्रित आधारावर एप्रिल-जून 2023 तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेने 1342.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2022 तिमाहीत बँकेचा निव्वळ 1864.34 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेने 281.73 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर स्टँडअलोन आधारावर बँकेने 1260 कोटी रुपये नफा कमावला आने. जो मागील वर्षी फक्त 308 कोटी रुपये नोंदवला गेला होता. पंजाब नॅशनल बँकचे NII म्हणजेच निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 7543 कोटी रुपयेवरून वाढून 9504 कोटी रुपयेवर पोहचले आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या प्रोविजनिंग 4814 कोटींवरून 4374 कोटी रुपये एवढी घट पाहायला मिळाली आहे. तिमाही आधारावर पंजाब नॅशनल बँक स्टॉकची प्रोविजनिंग 3624 कोटी रुपयेवरून 4374 कोटी रुपये वर पोहचली आहे. जून 2023 तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेचा एकूण NPA 7.73 टक्के नोंदवला गेला होता. मागील वर्षापूर्वी याच तिमाहीत तो हा NPA 11.27 टक्के नोंदवला गेला होता. मार्च 2023 तिमाहीत बँकेचा NPA 8.74 टक्के नोंदवला गेला होता. तर निव्वळ NPA वार्षिक आधारावर 4.28 टक्क्यांवरून कमी होऊन 1.98 टक्के नोंदवला गेला आहे. मार्च 2023 तिमाहीत बँकेने 2.72 टक्के NPA नोंदवला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarkari Bank Shares of Punjab National Bank share price today on 31 July 2023.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Shares(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x