18 May 2024 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! रेमिडियम लाइफकेअर शेअरने 3177% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स, डिटेल्स पहा

Multibagger Stock

Multibagger Stock | सध्या जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर नफा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीने आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिटसह मोफत बोनस शेअरचा लाभ देण्याची घोषणा केली होती.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स एक्स बोनसवर ट्रेड करत होते. या दरम्यान शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 1,570.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 3.98 टक्के वाढीसह 1,632.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेकॉर्ड तारीख :

रेमिडियम लाइफकेअर कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस जारी करण्यासाठी 29 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली होती. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 5 रुपये दर्शनी मूल्याच्या 5 इक्विटी शेअर्समागे 9 मोफत बोनस शेअर जारी केले आहे.

शुक्रवार दिनांक 28 जुलै हा दिवस कंपनीने एक्स बोनस तारीख म्हणून निश्चित केला होता. तर शनिवार दिनांक 29 जुलै हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आला होता. ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमध्ये 28 जुलै 2023 पर्यंत रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे इक्विटी शेअर्स असतील, त्यांना कंपनी 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स जारी करेल.

स्टॉक स्प्लिट डिटेल :

नुकताच रेमिडियम लाइफकेअर कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 5 रुपये दर्शनी मूल्याच्या दोन इक्विटी शेअर्समध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिटचा उद्देश सामान्यतः शेअरची व्यवहारात तरलता वाढवणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी स्टॉक परवडणारे बनवणे हा असतो. रेमिडियम लाइफकेअर कंपनीने आपल्या स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केली नाहीये.

स्टॉकची कामगिरी :

रेमिडियम लाईफकेअर शेअरने मागील एका महिन्याभरात काही खास कामगिरी केली नाहीये. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,676.94 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांना 3,177.10 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 3,230.58 टक्के नफा कमावून दिला आहे. जानेवारी 2023 मध्ये रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 7.10 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Remedium Lifecare Share Price today on 31 July 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x