8 May 2025 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

BIG BREAKING | 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपने EVM मध्ये छेडछाड करून जिंकलेली? अशोका विद्यापीठातील प्राध्यापकाच्या दाव्याने खळबळ

Big Breaking

BIG BREAKING | अशोका विद्यापीठातील एका प्राध्यापकाच्या रिसर्च पेपरवरून राजकीय वाद सुरू झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठी गडबडी केली होती, ज्यामुळे त्यांना मोठा विजय मिळाला होता, असा दावा विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे.

मात्र, धास्तावलेल्या विद्यापीठाने या रिसर्च पेपरमधील दावा फेटाळून लावताना स्वतःला वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या रिसर्च पेपरमध्ये करण्यात आलेले दावे हे विद्यापीठाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे, विद्यार्थ्याचे किंवा प्राध्यापकांचे वैयक्तिक मत असू शकते, असे विद्यापीठाने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे. त्याचा विद्यापीठाशी काहीही संबंध नाही. विद्यापीठाच्या नियतकालिकातही त्याला स्थान देण्यात आलेले नाही असं स्पष्टीकरण देताना विद्यापीठ प्रशासन दबावाखाली आल्याचं म्हटलं जातंय.

विद्यापीठात शिकवणारे सब्यसाची दास यांनी ५० पानांचा रिसर्च पेपर प्रसिद्ध केला असून, त्यातून निवडणूक व्यवस्था आणि भाजपवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. या रिसर्च पेपरमध्ये असे म्हटले आहे की, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता असलेल्या आणि विरोधकांचा तगडा उमेदवार असलेल्या भागात भाजपला आश्चर्यकारक मतं मिळाली होती.

ते पुढे म्हणतात की, ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती, त्या राज्यांमध्ये भाजपला तगडी स्पर्धा होती त्याच जागा भाजपने जिंकल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे बुथ स्तरावर भाजपकडून मोठा गोंधळ झाल्याचा रिसर्च पेपरमध्ये दावा केला आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे तिथेच पर्यवेक्षक म्हणून भाजपशासित राज्यांतील अधिकाऱ्यांची संख्या जास्त नेमण्यात आली होती आणि प्रशासनाच्या मदतीने त्या ठिकाणी भाजपने बाजी मारली, असेही या रिसर्च पेपरमध्ये म्हटले आहे.

राजकीय चर्चेला उधाण
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने या दाव्यांवर उत्तर द्यायला हवे. त्यांनी सविस्तर उत्तर द्यावे. एका प्रोफेसर आणि अभ्यासकाने केलेले दावे कोणत्याही राजकीय सूडबुद्धीने झालेले नाहीत. विसंगत मतांच्या संख्येबाबतही उत्तर देण्याची गरज आहे. त्यापासून पळ काढता येत नाही असं काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे.

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी या रिसर्च पेपरवर म्हटले की अर्ध्या रिसर्चच्या आधारे देशाच्या निवडणूक व्यवस्थेवर कोणी प्रश्न कसा उपस्थित करू शकतो? विद्यापीठाला याची परवानगी कशी देता येईल? याचे उत्तर दिले पाहिजे. हा रिसर्च पेपरवर अद्याप पूर्ण काम झालेले नाही आणि त्याचा समीक्षात्मक आढावा घेण्यात आलेला नाही, असे उत्तर विद्यापीठाने दिले. शैक्षणिक नियतकालिकातही ते प्रसिद्ध झाले नाही असं उत्तर देतं भाजपने यापासून पळ काढल्याचं म्हटलं जातंय.

News Title : Big Breaking research paper claims vote manipulation in 2019 Lok Sabha election Ashoka University 02 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BIG BREAKING(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या