4 May 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो
x

मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करणे ही ईश्वरी योजनाच : उद्धव ठाकरे

Shivsena, BJP, Udhav Thackeray, Narendra Modi, Loksabha Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत बहुमताने मिळालेल्या दणदणीत विजयानंतर नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधापदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील त्यांचा शाही शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामना संपादकीयच्या माध्यमातून मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक बनले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्वास वाटावा असे वातावरण निर्माण झाले व तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरला असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संकटात येईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. ज्यांनी ही भीती व्यक्त केली व आपली लढाई मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध असल्याची आरोळी ठोकली अशा मंडळींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. पण मोदी हे लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत व घटनेच्या चौकटीत राहूनच पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. शपथविधी सोहळय़ासाठी ममता बॅनर्जी यांना दिलेले निमंत्रण त्यांनी नाकारले. हे लोकशाहीच्या चौकटीत बसत नाही.

पश्चिम बंगालात निवडणूक काळात हिंसाचार झाला हे सत्य आहे. हिंसाचारात जे मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळय़ास बोलावले हे काही रुसण्याचे कारण होऊ शकत नाही. ही सर्व कुटुंबे बांगलादेशी नसून हिंदुस्थानी नागरिक आहेत व इतर सगळय़ांप्रमाणेच पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळय़ास हजर राहण्याचा अधिकार त्यांना आहे. ममता व त्यांच्या पक्षाला हे मान्य नसेल तर त्या लोकशाही मानत नाहीत हे नक्की अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x