15 May 2024 9:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

IDFC First Bank Share Price | बँक FD नव्हे! IDFC फर्स्ट बँकेचा शेअर देईल 20-25 टक्के परतावा, शेअरची किंमतही स्वस्त, टार्गेट प्राईस पहा

IDFC First Bank Share Price

IDFC First Bank Share Price | IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 93.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअरने स्पर्श केलेली ही सर्वकालीन उच्चांक किंमत आहे. मागील एक वर्षापासून IDFC फर्स्ट बँक स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 92.40 रुपये किमतीवर क्लोज झाली होती.

मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सेन्सेक्समध्ये फक्त 11 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. तर YTD आधारे IDFC फर्स्ट बँक स्टॉक 92.40 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

IDFC फर्स्ट बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 93.63 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 42.80 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी IDFC फर्स्ट बँक स्टॉक 0.54 टक्के वाढीसह 92.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IDFC फर्स्ट बँकेचे एकूण बाजार भांडवल 61,201.39 कोटी रुपये आहे. IDFC फर्स्ट बँकेने जून तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 61 टक्के वाढीसह 765 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. IDFC फर्स्ट बँकेने दिलेल्या माहितीनुसार निव्वळ नफ्यात झालेली वाढ मुख्यतः कोर ऑपरेटिंग उत्पन्नात जास्त वाढ झाल्यामुळे पाहायला मिळत आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या जून 2022 तिमाहीत IDFC फर्स्ट बँकेने 474 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. IDFC फर्स्ट बँकेने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, बँकेचा कोअर ऑपरेशन्समधील निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 45 टक्क्यांच्या वाढीसह 1,427 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत या बँकेने 987 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत IDFC फर्स्ट बँकेने 2,751 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर आता चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 36 टक्क्यांच्या वाढीसह 3,745 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. बँकेचे एकूण नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स 30 जून 2023 रोजी मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 3.36 टक्क्यांनी कमी होऊन 2.17 टक्क्यांवर आले आहे.

शेअरची टार्गेट प्राईस

IDFC फर्स्ट बँकेचा निव्वळ एनपीए जून 2022 मध्ये 1.30 टक्के नोंदवला गेला होता. तर जून 2023 तिमाहीत बँकेचा NPA 0.70 टक्के नोंदवला गेला होता. पुढील काही वर्षांत IDFC फर्स्ट बँक स्टॉक 20-25 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. या बँकेच्या स्टॉकवर तज्ञांनी 110 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या मते IDFC फर्स्ट बँक स्टॉक अल्पावधीत 98 ते 99 रुपये किमतीवर पोहोचू शकतो. आणि दीर्घकाळात हा स्टॉक 145 रुपये किंमत स्पर्श करेल, असे तज्ञ म्हणाले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IDFC First Bank Share Price today on 24 August 2023.

हॅशटॅग्स

#IDFC First Bank Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x