
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या महिन्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवरून 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत घसरला आहे. चला तर मग जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे….
आजचे सोन्याचे दर किती?
अधिकृत वेबसाइट ibjarates.com नुसार, 995 शुद्धता असलेल्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव आज सकाळी 58435 रुपयांवर आला आहे. तर 916 (22 कॅरेट) शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 53742 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धता (18 कॅरेट) सोन्याचा भाव 44003 रुपयांवर आला आहे. तर 585 शुद्धता असलेले सोने (14 कॅरेट) आज 34322 रुपयांवर आले आहे. तर 999 शुद्धता असलेली एक किलो चांदी आज 73397 रुपये झाली आहे.
दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असली तरी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव पुन्हा 60,000 ते 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचू शकतो. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो.
सोनं आणि त्याचा दर्जा
तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता की ते खरे की नकली. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं स्वस्त होत
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर येथेही सोने आणि चांदीचे दर नरम राहिले आहेत. कॉमेक्सवर सोन्याचा भाव 1940 डॉलर प्रति औंस आहे. याशिवाय चांदीचा भाव 24 डॉलर प्रति औंस वर कायम आहे.
एमसीएक्सवर सोने आणि चांदीचे दर
मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी घसरून 58724 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय एमसीएक्सवर चांदीच्या दरातही आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव आज 0.26 रुपयांनी घसरून 73,379 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.